चंदीगड : पंजाब (Punjab Election 2022 Results) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होताना दिसतोय. आतापर्यंतचे निकालाचे कल बघता, काँग्रेसला ३१ जागांवर विजयी आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसते. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू पिछाडीवर आहेत. सिद्धू हे अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरले होते. तिथे आम आदमी पक्षाच्या जीवनज्योत कौर रिंगणात आहेत. सध्या सिद्धू पिछाडीवर आहेत. त्याचदरम्यान, सिद्धू यांनी ट्वीट करून जनतेने जो कौल दिला आहे, तो स्वीकारत आहे, असे म्हणाले आहेत.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्वीट करून जनतेचा कौल स्वीकारत असल्याचे म्हटले आहे. ‘जनतेला आवाज हा परमेश्वराचा आवाज आहे….पंजाबच्या लोकांनी जो कौल दिला आहे, तो विनम्रतेने स्वीकारा…आम आदमी पक्षाचं अभिनंदन…’ असं सिद्धू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सिद्धू यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलावरून सध्या तरी असे दिसते की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून भगवंत मान यांचे नाव पुढे केले आहे. आप सरकार स्थापन करणार असे मानले जात असून, मुख्यमंत्री म्हणून मान हे शपथ घेतील, असे बोलले जात आहे. आपने सोशल मीडियावरून काही फोटो शेअर केले आहेत. त्यावरून असे दिसते की, आपने अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे.

बादल आणि अमरिंदर पिछाडीवर
पंजाबमध्ये अन्य दिग्गज नेतेही पिछाडीवर असल्याचे दिसते. त्यात अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दोन्हीही दिग्गज आहेत. पंजाबच्या ११७ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सुरू झाली. एक्झिट पोलमध्ये बहुतांश संस्थांनी ‘आप’ची पंजाबमध्ये सत्ता येईल, स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. आता सुरुवातीचे कल बघता, या संस्थांचे सर्व अंदाज खरे ठरताना दिसत आहेत.