अमृतसर: आम आदमी पक्षाचा झाडु जेव्हा चालतो तेव्हा भल्या भल्यांची सफाई होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत देशाने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली देदमान विजय पाहिला होता. आता २०२२ मध्ये आपने पुन्हा एकदा विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा विजय मिळवला आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत आप आदमी पक्षाने सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि प्रतिस्पर्धी शिरोमणी अकाली दल या पक्षांचा पराभव केला नाही तर या दोन्ही पक्षातील सर्व मोठ्या नेत्यांचा देखील पराभव केला. सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मतदारांनी घरी बसवले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी एक नव्हे तर दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि दोन्ही ठीकाणी त्यांचा पराभव झाला. चरणजीत यांनी चमकौर साहिब आणि भदौर येथून निवडणूक लढवली होती. चरणजीत यांनी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. पक्षात झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चरणजीत यांनी पद स्विकारले होते. पहिले दलित मुख्यमंत्री म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकाल आणि कलानुसार आपने ९२ जागांवर आघाडी/विजय मिळवला आहे. सत्ताधारी काँग्रेस १९, अकाली दर ४ तर भापज २ जागांवर आघाडी/विजय आहे.

फक्त मुख्यमंत्री नाही तर पक्षाचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांना देखील अमृतसर ईस्ट या मतदारसंघातून पराभव झालाय. आपच्या जीवन ज्योत कौर यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघातून अकाली दलाचे विक्रम मजीठिया देखील मैदानात होते. सत्ताधारी पक्षातील या दोन मोठ्या नेत्यांसोबत सरकारमधील अनेक मंत्र्यांचा पराभव झालाय. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह १९ हजार ८७३ मतांनी पराभव झाला.

विरोधकांना देखील धक्का

पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन पक्षांची सत्ता आजवर पाहायला मिळाली होती. आपने विजय मिळवताना फक्त काँग्रेसला नाही तर अकाली दलाला देखील झटका दिलाय. पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या प्रकाश सिंग बादल यांचे लंबी मतदार संघातून पराभव झालाय.

सिद्धूंनी केले आपचे अभिनंदन

कॅप्टननी दिल्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here