नवी दिल्ली : राज्यात आज ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत अनेक राज्यांमधला बहुमताचा आकडा आता स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपला परत येण्यापासून कोणताही पक्ष किंवा आघाडी रोखू शकलेली नाही. पण अशात पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ केला.

सध्या संपूर्ण देशात भगवा फडकल्याची चर्चा आहे, तर १८ राज्यांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष कायम आहेत. त्यामुळे ही पाच राज्यांची निवडणूक फार काही बदल करू शकली नाही. भाजपने मोठ्या वेगाने देशभर आपला विस्तार केला. हा विस्तार नेमका कसा झाला? जाणून घेऊयात.

Explainer : यूपीत विरोधकांचा धुव्वा; भाजपच्या ऐतिहासिक विजयामागील ४ मोठी कारणे
वाचा भाजपचा चढता आलेख

१. २०१४ मध्ये देशात ७ राज्यांमध्ये होतं भाजपचं सरकार होतं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केलं. यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये ५४५ मधील ३३७ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. यावेळी ७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. तर १४ राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार होतं. यानंतर २०१५ ते २०१७ च्या दरम्यान, यूपी, उत्तराखंडसह अनेक राज्ये भाजपने आपल्याकडे खेचून घेतली.

२. २०१८ मध्ये सर्वाधिक २१ राज्यांमध्ये भाजप सरकार निवडूण आलं. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारत काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसला प्रत्येक राज्यात पराभव स्विकारावा लागला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात भाजपची वापसी पाहायला मिळाली. यासोबतच २०१८ च्या सुरुवातीला सगळ्यात जास्त २१ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली.

3. २०१९ मध्ये सगळ्यात कमी राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. २०१८ च्या सुरुवातीला भाजपसाठी सर्व काही चांगले होतं. पण काही महिन्यांनंतरच त्यांच्या विजय रथाला सुरुंग लागला. कर्नाटकात भाजप सरकार पाडून काँग्रेसने आघाडी सरकार स्थापन केलं. यावेळी आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये भाजपचं सरकार पडलं. मात्र, नंतर कर्नाटक, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये भाजपने पुन्हा सरकार स्थापन केलं.

४. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचं १८ राज्यांमध्ये सरकार होतं. सगळ्यात विशेष म्हणजे ईशान्येच्या सर्व राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. फेब्रुवारी २०२२ ला गोवा, उत्तर प्रदेश, मणिपुर, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांसाठी विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. तर पंजाबमध्ये ‘आप’ने मोठं यश मिळवलं आहे.

Punjab Assembly Election 2022 Results : शहीद भगतसिंग यांच्या गावात भगवंत मान घेणार CMपदाची शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here