चंदीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत येईल, असे स्पष्ट झाले. दिल्लीनंतर ‘आप’ पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. यात आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसतेय. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या विजयानंतर भगवंत मान यांनी पंजाबच्या नागरिकांना संबोधित केले. ते उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे कळते.

भगवंत मान विजयी झाल्यानंतर त्यांनी पंजाबमधील नागरिकांना संबोधित केले. मान हे उद्या, शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा राजभवनाऐवजी शहीद भगत सिंग यांचे मूळगाव खटकड कलां येथे होईल. या ठिकाणी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात होत होता. मात्र, शपथ घेण्यापूर्वी मान हे शहीद स्मारकाला अभिवादन करतील, असेही सांगितले जाते.

Sanjay Raut On BJP and Elections Results : शिवसेना, नोटा अन् भाजपचा टोला; संजय राऊत म्हणाले, मोदी-शहा…
Punjab Election 2022 Results : पंजाबमध्ये काँग्रेसला ‘या’ गोष्टीचा फटका, ‘आप’चं अभिनंदन करतानाच सिद्धू म्हणाले…

दुसरीकडे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग १३ हजार आणि सुखबीर सिंग बादल यांना जवळपास १२ हजार मतांनी निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. तर विद्यमान मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनाही पराभवाचा धक्का बसला. विशेष म्हणजे, काँग्रेस, अकाली दल आणि भाजपसह त्यांचे सहयोगी पक्ष या सर्वांचे मिळूनही आपएवढी मते मिळाली नाहीत. दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ते उद्याच राज्यपालांकडे पदाचा राजीमाना देण्याची शक्यता आहे, असे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here