राजपिपलाः गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियामध्ये असलेली ” विकण्याची जाहिरात थेट OLX वरच दिल्याचं समोर आलंय. पण ही जाहिरात देणं आता महागात पडलंय. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय सेवा आणि सरकारी हॉस्पिटल्सवरील खर्च भरून काढण्यासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ३० हजार कोटी रुपयांत विकणे आहे, अशी जाहिरात OLX वर देण्यात आली होती. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक आहे. तिथे त्यांचा १८२ मीटर उंच पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८मध्ये या स्मारकाचं उद्घाटन केलं होतं.

३०, ००० कोटींत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीला

एका अज्ञात व्यक्तीने ओएलएक्सवर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची जाहिरात दिली होती. हॉस्पिटल्ससाठी आवश्यक असलेली उपकरणं खरेदी करण्यासाठी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ३० हजार कोटींमध्ये विकायची आहे, असं म्हटलं होतं, अशी माहिती केवडिया पोलिसांनी दिली.

एका वृत्तपत्रात यासंदर्भात बातमी आल्यानंतर स्मारकाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर वेबसाइटवरून ही जाहिरात हटवण्यात आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here