नवी दिल्ली : देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊ लागले आहे. ५ पैकी भाजपने ४ राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला तर पंजाबमध्ये मात्र ‘आप’ने बाजी मारली. अशात काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या दारुण पराभवानंतर ट्विट करून पराभव स्वीकारला आहे.

राहुल गांधी यांनी गेल्या ९ वर्षात १० व्यांदा पराभव स्वीकारल्याचं बोललं आहे. याआधीही राहुल गांधींच्या बंगाल निवडणुका (२०२१), लोकसभा निवडणुका (२०१९), मेघालय-त्रिपुरा-नागालँड (२०१८), यूपी-पंजाब-गोवा-उत्तराखंड (२०१७), गुजरात (२०१७), बंगाल-आसाम (२०१६), हरियाणा- महाराष्ट्र (२०१४), लोकसभा निवडणूक (२०१४), दिल्ली (२०१३) आणि राजस्थान (२०१३) मध्ये त्यांनी ट्विट करून पराभव स्वीकारल्याचं सांगितलं होतं.

Explainer : फक्त ८ वर्षात मोदींनी केली भगवी क्रांती, कशी? वाचा सविस्तर
काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन योग्य नव्हते : शिवसेना

पाचही राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. गोवा-उत्तराखंडमध्ये विजय मिळेल अशी अशी अपेक्षा होती, पण तिथेही पराभव स्विकारावा लागला. अखिलेश आणि त्यांच्या मित्र पक्षाकडूनही अपेक्षा होत्या पण त्यांची कामगिरी तितकीशी चांगली झाली नाही. पंजाबमध्ये काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन चांगले नव्हते आणि भाजपचा विजय हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा विजय आहे.

Explainer : यूपीत विरोधकांचा धुव्वा; भाजपच्या ऐतिहासिक विजयामागील ४ मोठी कारणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here