बाल्टीमोर, युनायटेड स्टेटस् :

एका डुक्कराचं हृदय ट्रान्सप्लान्ट करण्यात आलेल्या जगातील पहिल्या व्यक्तीचा शस्रक्रियेनंतर दोन महिन्यांनी मृत्यू झालाय. गेल्या मंगळवारी, अमेरिकेच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल मेडिकल सेंटर‘मध्ये या रुग्णानं अखेरचा श्वास घेतला.

डेव्हिड बेनेट असं या ५७ वर्षीय रुग्णाचं नाव होतं. ७ जानेवारी रोजी बेनेट यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटचा उपाय म्हणून जेनेटिक बदल करत रुग्णाच्या शरीरात एका डुक्कराचं हृदय जोडलं होतं. अशक्यप्राय वाटणारी ही शस्त्रक्रिया अमेरिकेच्या मेरिलँड रुग्णालयानं यशस्वीरित्या पूर्ण केली होती. परंतु, या शस्त्रक्रियेनंतर दोन महिन्यांनीच बेनेट यांचा मृत्यू झालाय.

Organ Transplant: ब्राव्हो! मानवी शरीराला जोडलं डुक्कराचं हृदय, शास्त्रज्ञांना मोठं यश
मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी अद्याप डेव्हिड बेनेट यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी डेव्हिड यांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

या अगोदर गेल्या महिन्यात मेरीलँड रुग्णालयाकडून डेव्हिड बेनेट यांचा एक व्हिडिओही जाहीर करण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर डेव्हिड यांची प्रकृती उत्तम असून ते आपल्या फिजिकल थेरेपिस्टसोबत काम करत आहेत तसंच फुटबॉल मॅच पाहत असल्याचंही रुग्णालयानं सांगितलं होतं.

जगभरात प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवांची कमतरता जाणवत असताना जनुकीयरित्या बदल करून (Genetically Modified) प्राण्यांचे हृदय माणसाच्या शरीरात कार्य करू शकतं, हे रुग्णालयानं प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवलं होतं.
Ukraine Crisis: युक्रेनमध्ये रशियानं नवजात बालकांनाही सोडलं नाही, बॉम्बवर्षावात रुग्णालय उद्ध्वस्त
Ukraine Crisis: रशियाविरुद्ध झुंजणाऱ्या युक्रेनला अमेरिकेकडून १३.६ अब्ज डॉलरची मदत
Miss Bumbum Suzy Cortez: रशिया अध्यक्ष पुतीन यांना ‘हिंसक मनोरुग्ण’ म्हणणारी ‘मिस बमबम’ चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here