अमृतसर- पंजाबमधील सर्व ११७ जागांवर (पंजाब निवडणूक निकाल 2022) मतमोजणी सुरू आहे, परंतु कल पाहिल्यास, आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पंजाबमध्ये ‘आप’ ने चमकदार कामगिरी केली. मोगातून काँग्रेसच्या उमेदवार आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ची बहीण मालविका सूदही मागे पडल्या. सोनूने बहीण मालविकाला पाठिंबा दिला नाही, हेच तिच्या पराभवामागचं सर्वात मोठं कारण आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मालविका यांच्यासमोर भाजपचे विद्यमान आमदार हरजोत कमल आहेत. त्याचवेळी आपच्या डॉ. अमनदीप कौर अरोरा आणि शिरोमणी अकाली दलाच्या बरजिंदर सिंग माखन ब्रार यांच्यातही तगडी स्पर्धा आहे. काँग्रेसच्या मालविदा सूद ४४९० मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर आप पहिल्या क्रमांकावर आणि अकाली उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

मालविका- सोनू सूद

विशेष म्हणजे, करोना साथीच्या काळात सोनूने लाखो लोकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले होते. या कारणास्तव लोकांनी त्याला ‘गरीबांचा देव’ ही पदवी दिली होती. यानंतर सोनू राजकारणात उतरेल अशी अटकळही बांधली जात होती. पण सोनूने त्याला राजकारणात सध्यातरी रस नसल्याचं सांगितलं. अभिनेता जरी राजकारणात आला नसला तरी त्याची बहीण मालविका राजकारणात आली आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मालविका- सोनू सूद

सोनू सूदने ई-टाइम्सशी बोलताना सांगितले की, मला बहिणीचा अभिमान आहे. ती अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये राहते आणि तेथील समस्या चांगल्याप्रकारे जाणते. यावेळी आपला राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचेही अभिनेत्याने स्पष्ट केले होते. तसेच बहिणीसाठी कोणताही प्रचार करणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. बहिणीने स्वतः कष्ट करून स्वतःची कामं करावी अशी सोनूची इच्छा आहे.

आता मालविका मागे राहिल्याने सोनू सूदने तिला साथ दिली नाही हे त्यामागचं मोठं कारण आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनू सूद याबाबत आपलं मत मांडणार का, हे येणाऱ्या काळात कळेलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here