मुंबई : सफाईचे काम करताना तीन कामगार सेप्टिक टँकमध्ये पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कांदिवलीमधील एकता नगरमध्ये ही दुर्घटना घडली. (Mumbai Septic Tank Deaths)

एकता नगर परिसरातील चारकोप लिंक रोडवर स्वच्छतेचं काम सुरू होतं. हे काम करताना दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास तीन कामगार सेप्टिक टँकमध्ये पडले. ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी तातडीने याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. दुर्घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने सेप्टिक टँकमध्ये पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आले. मात्र कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरू असतानाच तीनही कामगारांचा मृत्यू झाला.

‘मोदींनंतर पुढचे पंतप्रधान योगीच!’; पाकिस्तान मीडियात योगींची जोरदार हवा

दरम्यान, सफाई कामगारांच्या सुरक्षिततेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होते. अशातच आज कांदिवलीत घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here