आधी ३ मग आणखी २ जवान शहीदनियंत्रण रेषेजवळ (LoC) झालेल्या या चकमकीत हिमाचल प्रदेशातील सुभेदार संजीव कुमार, उत्तराखंडचे हवलदार देवेंद्र सिंह, हिमाचल प्रदेशचे पॅरा ट्रुपर बाळ कृष्ण, उत्तराखंडचे पॅरा ट्रुपर अमित कुमार आणि राजस्थानचे छत्रपाल सिंह हे शहीद झाले. पण त्यापूर्वी या जवानांनी ५ दहशतवाद्यांचा जागेवरच खात्मा केला.
खराब हवामान आणि चिंचोळ्या रस्त्यामुळे जखमी जवानांना नेण्यात मोठ्या अडचणी
काश्मीरच्या उत्तर भागात असलेल्या केरन सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. पण खराब हवामान आणि उंच डोंगर असूनही लष्कराच्या जवानांनी त्यांना रोखून धरलं. यावेळी चकमक उडाली. यात एक जवान चकमकीत शहीद झाला. तर ४ जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना चकमकीतून बाहेर काढून लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान दोन जवान शहीद झाले. यानंतर जखमी असलेल्या आणखी दोघांनी रात्री उशिरा प्राण सोडले. यात ४ जवान आणि १ जीओसी पदावरील अधिकारी शहीद झाला, अशी माहिती कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
जखमी जवानांना घटनास्थळावरून बाहे काढल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता अनेक अडचणी आल्या. कच्च्या रस्त्यांमुळे आणि त्यावेळी सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद होते, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली.
४ एप्रिलला ४ दहशतवाद्यांचा खात्मा
दक्षिण काश्मीरमधील बटबुरा भागात लष्कराने चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतावद्यांनी एका नागरिकाची हत्या केली होती. केरन सेक्टरमध्ये लष्कराने त्यांना घेरलं होतं. हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होते. पण जवानांनी त्यापूर्वीच त्यांचा खात्मा केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times