लखनऊ, उत्तर प्रदेश :

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ चा निकाल आता स्पष्ट झालाय. मात्र, लखीमपूर खीरी जिल्ह्याच्या निकालानं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. लखीमपूर खीरी जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. या आठही जागांवर भाजपनं ताबा मिळवल्याचं निवडणूक निकालांतून समोर येतंय.

लखीमपूरच्या आठही जागांवर भाजपचा विजय हे गोष्ट अनेकांना पचवणं जड जातंय याचं कारण म्हणजे याच लखीमपूर खीरीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याच्यावर शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा आरोप ठेवण्यात होता. तसंच पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रावर कलम ३०२ अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

लखीमपूर खीरी जिल्ह्यात पलिया, निघासन, गोला गोकर्णनाथ, श्री नगर, धोरहरा, लखीमपूर, कसता आणि मोहम्मदी हे आठ विधानसभा मतदारसंघ येतात. ‘नवभारत टाईम्स’नं आपल्या निवडणूक वार्तांकनादरम्यान लखीमपूर खीरी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी भाजप सरकारविरोधातील नागरिकांचा रोषही समोर आला होता. भाजपनं अजय मिश्रा टेनी यांना मंत्रिमंडळातून हटवायला हवं होतं, अशी भावना मोठ्या संख्येत नागरिकांनी व्यक्त केली होती.


Labh Singh Ugoke: मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या ‘आम आदमी’नं मुख्यमंत्र्यांना पछाडलं
Yogi Adityanath: यूपीत भाजपला स्पष्ट बहुमत, जाणून घ्या नागरिकांना काय काय ‘मोफत’ मिळणार
शीख बहुसंख्या निघासन मतदारसंघ

यावेळी, सदर मतदारसंघात भाजपला नागरिकांचा आधार दिसून आला असला तरी शीख बहुसंख्य अशा निघासन मतदारसंघात मात्र भाजपविषयीची नाराजी दिसून आली होती.

शेतकरी आंदोलना दरम्यान जीव गमवावा लागलेला पत्रकार रमन कश्यप याच निघासन मतदारसंघाचा रहिवासी होता. ‘नवभारत टाईम्स’च्या पत्रकारांशी बोलताना आशिष मिश्राच्या तुरुंगातून सुटकेविषयी बोलताना रमनच्या आई-वडिलांचा राग उफाळून आला होता. आपल्या मुलासहीत तब्बल आठ जणांचा जीव घेणाऱ्या आशिष मिश्राची केवळ १२८ दिवसांत सुटका होणं, ही गोष्ट त्यांना बोचत होती.

पलिया मतदारसंघात गेल्या वेळी भाजपनं विजय मिळवला होता परंतु, यंदा मात्र अशी परिस्थिती दिसून येत नव्हती. सपाकडून इथे भाजपला जोरदार टक्कर देण्यात आली होती.

गोला मतदारसंघात मात्र लखीमपूर खीरी कांडाचा फारसा फरक पडलेला दिसला नाही. सरकारकडून मिळणाऱ्या सोई-सुविधांमुळे आणि थेट अकाऊंटमध्ये जमा होणाऱ्या पैशांमुळे मजूर वर्ग भाजपच्या पाठिशी दिसला.

BJP in UP: उत्तर प्रदेशात ‘ना सायकल, ना हाथी, ना हाथ बा…’, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
Shivsena in UP: ४१ जागा लढवणाऱ्या शिवसेनेची उत्तर प्रदेशात दाणादाण; पाहा काय आहे सद्यस्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here