नंदुरबार : सातपुड्यातीच्या तोरणमाळ येथे पबजी गेम खेळण्याच्या नादात एका २० वर्षांच्या युवकाने जीव गमावला आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ येथील सिताखाई पॉईंट ओळखला जातो. या ठिकाणी पबजी गेम खेळताना खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय जुलेश ठाकूर असं मृत तरुणाचं नाव आहे. (Pubg Game Addiction Death)

मोबाईलला नेटवर्क मिळावं यासाठी धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील विजय ठाकूर हा युवक मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत सिताखाई पॉईंट येथे गेला. मात्र आजूबाजूच्या स्थितीचा अंदाज न आल्याने विजय दरीत कोसळला. याबाबत माहिती मिळताच विजयचे नातेवाईक आणि मित्र सिताखाई येथे पोहोचले. मात्र रात्री उशीर झाल्याने वन्यप्राण्यांचा धोका आणि खाली उतरण्यासाठी साधनांची कमतरता यामुळे विजयचा शोध घेण्यास यश आलं नाही.

‘मोदींनंतर पुढचे पंतप्रधान योगीच!’; पाकिस्तान मीडियात योगींची जोरदार हवा

दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी दुपारी स्थानिक नागरिक जीवन रावताळे, रवी चौधरी, भरत चौधरी, विक्की चव्हाण, जिरबान नाईक, मोना नाईक, मनोज रावताळे, पिण्या रावताळे, सुरेश ठाकूर, विकला नाईक, गुंजा नाईक यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या मदतीने विजय ठाकूर याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. सुहास पाटील यांनी शवविच्छेदन केले आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

दरम्यान, याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. चंदू साबळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here