कोल्हापूर : चालकाचा ताबा सुटून कार ३०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात आईसह तीन महिन्याचे बाळ ठार झालं आहे. डॉ. सृष्टी संतोष हरकुडे (वय ३२) आणि मुलगा निवांत संतोष हरकुडे (वय-३ महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातात कारमधील इतर सहा जण गंभीर जखमी झाल्याची नोंद देवरूख पोलिसांत झाली आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी २ वाजता कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात चक्री वळणावरील विसावा पॉईंट येथे घडला. (Kolhapur Accident News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हरकुडे आणि डॉ. फुलारे दोन गाडीतून गणपतीपुळे देवदर्शनासाठी निघाले असताना आंबा घाटातील चक्री वळणावरील विसावा पाईंटवरू कार दरीत ३०० फूट खाली कोसळली. या अपघातात डॉ. सृष्टी हरकुडे आणि त्यांचा मुलगा हे दोघेजण ठार झाले. गाडीतील डॉ. संतोष हरकुडे (वय ३५), मुलगी मन्मिता (३ वर्षे), डॉ. प्रताप तंबाखे (वय ७०), रेहान प्रणव सुभेदार , डॉ. दीप्ती फुलारे (वय ३२), मुलगी आज्ञा फुलारे (वय ६ वर्ष, सर्वजण रा. विश्रामबाग, सांगली) हे सहा जण जखमी झाले आहेत.

PUBG खेळताना तो खोल दरीशेजारी पोहोचला आणि…; घटनेनं मित्रांसह नातेवाईकही हादरले!

मृतदेहाचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रूग्णालयात करण्यात आलं, तर जखमींना कोल्हापूरातील खासगी हॉस्पिटल अस्टर आधार येथे दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अपघातस्थळी आंब्यातील स्थानिक तरूण प्रमोद माळी, दिग्विजय गुरव, सुनील काळे, स्वप्निल गायकवाड, साहिल नागरगोजे, कृष्णा पाटील, युवराज कांबळे, अविनाश कांबळे, देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण पाटील, रेस्क्यू टीमचे काकडे आदींनी मृत व जखमींना दरीतून वर काढण्यासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here