गेल्या दोन वर्षांमध्ये करोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील महसूलाची आवक घटली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे आता जुने आणि नवे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार कशाप्रकारे आर्थिक सांगड घालतात हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८ टक्के या दराने विकास दरात घट झालेली असताना आता त्याला मागे टाकत २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्याच्या विकास दरात १२.१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था रूळावर आली आहे. कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची परिस्थिती सुधारली आहे. या आश्वासक चित्रामुळे महाविकासआघाडी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.
Live Updates:
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक आणि पुण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, औद्योगिक उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राला गती, आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्ष
राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर होणार