रविवारी सकाळी साडेनऊ वाजता पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आधुनिक ड्रिल मशिनच्या साह्याने पुलाला ४० होल पाडण्यात आले. नवयुग कंपनीतर्फे हे काम करण्यात आले. यानंतर स्फोटकांच्या साह्याने पूल पाडण्यात आला. रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता डी. डी. उकिर्डे, अधीक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता आर. पी. सोनवणे, ठाणे महामार्ग पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, पोलिस निरीक्षक सुदाम पाचोरकर आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक किलोमीटर क्रमांक ४४ अंडा पाँइंट येथून जुन्या मार्गाने लोणावळा एक्झिट येथून पुन्हा एक्सप्रेस वर वळविण्यात आली आहे. पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या मार्गाने लोणावळा एक्झिट येथून ४४ अंडा पाँइंट अशी वळविण्यात आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times