Devendra Fadnavis | गोव्यात देवेंद्र फडणवीस यांनीच उमेदवारांची निवड केली होती. पणजीत उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारून देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धोका पत्करला होता.

 

Devendra Fadnavis (1)
देवेंद्र फडणवीस, भाजप

हायलाइट्स:

  • एक्झिट पोल्सनी गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्त्वात येईल, असा अंदाज वर्तविला होता.
  • गोव्यात बहुमतासाठी २२ जागांची गरज होती
मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी होते. त्यामुळे आता गोव्यातील भाजपच्या दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन आणि पत आणखीनच वाढली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच गोव्यातील विजयाचे शिल्पकार आहेत, अशी भावना भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मुंबईतील भाजप मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा जंगी सत्कार केला जाणार आहे. या सत्कार समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस दाखल होतील. त्यानंतर याठिकाणी त्यांचा सत्कार होईल. (Goa assembly election results 2022)

त्यामुळे सध्या मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणावर बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, अशा संदेशांपासून ते शुभेच्छा देणारा मजकूर पाहायला मिळत आहे.
Devendra Fadnavis: आम्ही एकदा धोका खाल्लाय वारंवार खाणार नाही: देवेंद्र फडणवीस
एक्झिट पोल्सनी गोव्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्त्वात येईल, असा अंदाज वर्तविला होता. याठिकाणी बहुमतासाठी २२ जागांची गरज होती. मात्र, काँग्रेस आणि भाजपपैकी कोणालाच बहुमत मिळणार नाही, असे अंदाज होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली उमेदवारांची निवड, अचूक व्यवस्थापन आणि प्रचारामुळे भाजपने हे सगळे अंदाज मोडीत काढत गोव्यात २० जागा जिंकल्या. त्यानंतर अपक्ष उमेदवारांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ केला. त्यामुळे गोव्यात भाजप सहजपणे सत्ता स्थापन करेल, हे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतही आपल्या राजकीय कौशल्याची चुणूक दाखवली होती. त्याठिकाणीही भाजपने तेजस्वी यादव यांचे आव्हान परतवून लावत मोठे यश मिळवले होते. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील राजकीय वजन वाढले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : devendra fadnavis will recive massive welcome in mumbai after bjp win in goa assemby election resutlts 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here