वृत्तसंस्था, आंताले :

रशिया आणि युक्रेनमधील उच्च स्तरावर झालेली राजनैतिक चर्चा निष्फळ ठरली आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. युक्रेन-रशिया संघर्ष त्यामुळे सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांच्यामध्ये तुर्की येथे भेट झाली. संकटग्रस्तांच्या सुटकेसाठी कॉरिडॉर तयार करणे आणि शस्रसंधीवर दोघांमध्ये चर्चा झाली. ‘रशियामध्ये अन्य कुणीही निर्णय घेणारी व्यक्ती नाही, की ज्या व्यक्तीबरोबर चर्चा करता येईल; त्यामुळे युद्धामुळे तयार झालेल्या मानवी समस्यांवरील चर्चा लाव्हरोव्ह यांच्याबरोबर सुरू राहील. रशिया शस्त्रसंधीच्या विचारात नव्हते. युक्रेनने शरणागती पत्करावी, अशी अपेक्षा रशियाला आहे. युक्रेन असे कदापि करणार नाही,’ असे कुलेबा म्हणाले.

रशियाकडून हॉस्पिटलवर हल्ला

रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढविले असून, गुरुवारी मारिओपोल येथील एका रुग्णालयावर हल्ला झाल्याने रशिया टीकेचे लक्ष्य बनला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका लहान मुलीचाही समावेश आहे.

रशियाकडून दोन आठवड्यांपासून आरोग्य आणि वैद्यकीय सेवेशी संबंधित एकूण १८ हल्ले झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. या हल्ल्यांमुळे नागरिकांकडील अन्न आणि पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत युक्रेनमधून ३५ हजार नागरिकांनी यशस्वीपणे स्थलांतर केल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्लजिमिर झिल्येन्स्की यांनी दिली. रुग्णालयांवरील हल्ल्याची रात्र ही कीव्हबाहेरील युक्रेनच्या नागरिकांसाठी भयानक रात्र होती. सुरुवातीला लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर अचानक रशियाने निवासी परिसरातही हल्ले केल्याचे युक्रेनचे उपगृहमंत्री वादिम दिनिस्येन्का यांनी सांगितले. युक्रेनकडून रशियाला अद्याप शरणागतीची अपेक्षा असल्याचे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमेत्रो कुलेबा यांनी सांगितले.

Ukraine Crisis: युक्रेनमध्ये रशियानं नवजात बालकांनाही सोडलं नाही, बॉम्बवर्षावात रुग्णालय उद्ध्वस्त
Ukraine Crisis: रशियाविरुद्ध झुंजणाऱ्या युक्रेनला अमेरिकेकडून १३.६ अब्ज डॉलरची मदत
‘मारिओपोल येथील रुग्णालये लष्करी तळ’

युक्रेनच्या मारिओपोल शहरातील रुग्णालये लष्करी तळ म्हणून काम करीत असल्याचा दावा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी गुरुवारी केला. हे प्रसुती रुग्णालय बऱ्याच काळापासून अझोव्ह बटालियन आणि इतर कट्टरपंथीयांनी व्यापले आहे. त्यांनी गर्भवती महिला, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. हा अल्ट्रा-रॅडिकल अझोव्ह बटालियनचा तळ होता,’ असा दावा लाव्हरोव्ह यांनी केला. तुर्कस्तानात युक्रेनच्या मुत्सद्द्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते बोलत होते.

रुग्णालयावरील हल्ल्यानंतर रशिया, युक्रेनची चर्चा

दोन आठवड्यांच्या युद्धानंतर युक्रेन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गुरुवारी प्रथमच समोरासमोर चर्चा केली. मॉस्को येथील मुलांच्या रुग्णालयावरील हल्ल्यात एका लहान मुलीसह तीन जणांच्या झालेल्या मृत्यूच्या विषयावर या वेळी प्रामुख्याने चर्चा झाली. युद्धामुळे युक्रेनच्या सीमा ओलांडून

Miss Bumbum Suzy Cortez: रशिया अध्यक्ष पुतीन यांना ‘हिंसक मनोरुग्ण’ म्हणणारी ‘मिस बमबम’ चर्चेत
volodymyr zelenskyy: रशियासोबत ‘तडजोडी’साठी युक्रेन तयार? ‘नाटो’ संदर्भात झेलेन्स्की यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Ukraine Crisis: खासगी कंपन्यांकडून रशियाची कोंडी; ३०० हून अधिक ‘ब्रॅन्डस’नं घेतली ठाम भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here