Sanjay Raut | पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी गुरुवारी भ्रष्टाचारी लोक केंद्रीय तपासयंत्रणांच्या कारवाईला विरोध करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख महाविकासआघाडीच्या दिशेने होता.

 

Sanjay Raut: पंतप्रधान मोदींच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, कोणी काहीही बोलले तरी...
Sanjay Raut: पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, कोणी काहीही बोलले तरी…

हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपावर संजय राऊताचं प्रुत्यत्तर
  • तपासयंत्रणांच्या कारवाईला भ्रष्टाचाऱ्यांची इकोसिस्टीम विरोध करतेय
मुंबई: देशातील भ्रष्टाचाऱ्यांच्याविरोधात केंद्रीय तपासयंत्रणा कारवाई करत आहेत. मात्र, या कारवाईला भ्रष्टाचाऱ्यांची इकोसिस्टीम एकत्र येऊन विरोध करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला होता. पंतप्रधान मोदींच्या या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय तपासयंत्रणा हा भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करतात. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्रीय तपासयंत्रणा राजकीय दबावाखालीच काम करतात, या मतावर महाविकासआघाडी ठाम आहे. कोणी काही बोलले तरी आमच्या मतात फरक पडणार नाही. या वक्तव्यानंतर पुढच्या क्षणाला माझ्या घरावर धाड पडली तरी मला फरक पडत नाही. केंद्रीय तपासयंत्रणांकडून शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांना राजकीय कारणांसाठीच लक्ष्य केले जात आहे. केंद्रीय तपासयंत्रणा या चुकीच्या पद्धतीने काम करतायत हे सांगितले तर त्यामध्ये दबाव आणण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची पत वाढली, मुंबईत भाजपकडून जंगी सत्काराची तयारी
यावेळी संजय राऊत यांनी पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालासंदर्भातही भाष्य केले. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या जागा तिप्पटीने वाढल्या. समाजवादी पक्षाचे संख्याबळ ४२ वरून १२५ पर्यंत वाढले. भाजपच्या विजयात मायवती आणि ओवेसी यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आता या दोघांना पद्मविभूषण किंवा भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
चंद्रकांत पाटील फु्ल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला; फडणवीसांच्या स्वागताला भाजप मुख्यालयात जल्लोष
लोकशाहीत हार-जीत होत असते. त्यामुळे आम्हाला भाजपच्या विजयाने दु:ख होण्याचे कारण नाही. आम्ही भाजपच्या आनंदात सहभागी आहोत. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती मतं मिळाली, असा प्रश्न भाजपचे नेते विचारतात. पण मग पंजाबमध्ये भाजपची अवस्था काय झाली? प्रखर राष्ट्रवादी भाजपला पंजाबमध्ये विजय का मिळाला नाही, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला त्यापेक्षा वाईट अवस्था भाजपची पंजाबमध्ये झाली, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena mp sanjay raut hits back pm narendra modi over ed and central agencies statement
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here