मुंबई: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा यांसह चार राज्यांत भाजपला मोठं यश मिळालं. या विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोवा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतानाच, विरोधकांवर हल्ला चढवला. कितीही मळमळ झाली तरी, मोदीच येणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपनं उत्तर प्रदेशसह गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. या ठिकाणी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा सपाटून पराभव केला. गोव्यातही भाजपनं २० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. गोव्यात भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनाही दिलं जातंय. गोव्यातील विजयात मोलाचा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. नेत्यांनी यावेळी नाचून या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. फडणवीस यांनी सुरुवातीला सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचेही आभार मानले. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली, असे फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटील फु्ल्ल जोशात, झेंडा घेऊन नाचले, ढोलही वाजवला; फडणवीसांच्या स्वागताला भाजप मुख्यालयात जल्लोष
गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची पत वाढली, मुंबईत भाजपकडून जंगी सत्काराची तयारी

‘मोदी है तो मुमकिन है’ असं सगळ्यांनाच वाटतं आणि ते या निवडणुकांत अनुभवायला मिळालं. आपल्यासाठी मोदी आहेत. करोनाकाळात मोदी आहेत. मोदी आपल्याला मरू देणार नाहीत. बेरोजगार, उपाशी ठेवणार नाहीत असा जो सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटतो, तो विश्वास यातून परावर्तीत झाला आहे, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचा आनंद सगळ्यांनाच झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ झाली की, अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा असं आहे. इतकी मळमळ बरी नाही. कितीही मळमळ झाली तरी येणार तर मोदीच. काळजी करू नका. या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, महिलांचा आशीर्वाद मोदी आणि भाजपला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis : ‘पेन ड्राइव्ह बॉम्ब’नंतर देवेंद्र फडणवीसांना धोका? भाजप नेता म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here