अहमदनगर: पर्यटन व्हिसावर नगरमध्ये येऊन केल्याचे चौकशीत समोर आल्यानंतर २९ परदेशी नागरिक आणि परराज्यातील सहा जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दिल्लीतील निजामुद्दीन येथे अनेक देशांतील नागरिक आले होते. त्यातील काही जण नगरमधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात काही नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हेरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. त्यांना वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्याविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परदेशी नागरिकांचे पासपोर्ट, व्हिसा व इतर कागदपत्रे पोलिसांनी तपासली. त्यात हे सर्व जण भारतात पर्यटन व्हिसावर आलेले आहेत. पर्यटनाऐवजी या देशात धार्मिक कार्यासाठी, धर्मप्रसारासाठी आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भिंगार कॅम्पला नऊ परदेशी व त्यांच्याबरोबर असलेले चार भारतीय नागरिक, जामखेड पोलीस ठाण्यात दहा परदेशी व दोन भारतीय, तर नेवासा पोलीस ठाण्यात दहा परदेशी अशा २९ परदेशी व सहा भारतीय नागरिक अशा एकूण ३५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परदेशी नागरिकांविरोधात परदेशी नागरिक कायदा, भारतीय साथरोग प्रतिबंध कायदा, जिल्हाधिकारी आदेशाचे भंग करणे असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here