ल्हासा, तिबेट :

चीनच्या घुसखोरीविरुद्ध तिबेटनंही आता आवाज उंचावलाय. गुरुवारी कोलकाता स्थित चीनच्या दूतावासाबाहेर तिबेट नागरिक आणि भारतीय नागरिकांनी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला.

सेंट्रल तिबेट ऑर्गनायझेशन‘चा एक भाग म्हणून इंडो-तिबेट समन्वय कार्यालय (ITCO) यांच्या नेतृत्वाखाली, तिबेट आणि भारतीय झेंडे फडकवत आंदोलकांनी निषेध केला. यावेळी आंदोलकांच्या हातात दलाई लामा यांचे फोटोही होते.

भारत – चीन दरम्यान ‘बफर स्टेट‘ची आवश्यकता

‘भारतानं स्वतंत्र तिबेटला मान्यता द्यावी अशी आमची इच्छा आहे. हा एक स्वतंत्र देश होता आणि ‘जगाचं छप्पर’ नावानं ओळखला जाणाऱ्या या देशावर पीएलएकडून ताबा मिळवण्यापर्यंत भारत आणि चीन यांच्यात बफर स्टेटची भूमिका निभावत होता’ असं ITCO समन्वयक जिग्मे त्सुलत्रिम यांनी म्हटलंय. तिबेटींना अधिकृतपणे निर्वासितांचा दर्जा देण्यात यावा तसंच दलाई लामा यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

उल्लेखनीय म्हणजे, ल्हासा इथं झालेल्या चिनी हल्ल्याच्या विरोधात १९५९ मध्ये तिबेटीय नागरिकांनी याच दिवशी शांततामय मार्गानं चीनचा निषेध नोंदवला होता. या निषेधाच्या वर्धापन दिनाला ठिकठिकाणी ही आंदोलनं करण्यात आली. चीनच्या या हल्ल्यामुळे दलाई लामा आणि त्यांच्या असंख्य अनुयायांना पळून जाऊन भारतात आश्रय घ्यावा लागला होता.

Ukraine Talks with Russia: तुर्कीत पार पडलेली रशियासोबतची चर्चा निष्फळ, युक्रेनची माहिती
Ukraine Crisis: युक्रेनमध्ये रशियानं नवजात बालकांनाही सोडलं नाही, बॉम्बवर्षावात रुग्णालय उद्ध्वस्त

तिबेटसाठी एका मंत्र्याची गरज

लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी लष्करी घुसखोरीच्या वाढत्या घटनांचा संदर्भ देताना, आशियातील दोन महासत्तांमध्ये (भारत आणि चीन) बफर स्टेटची आवश्यकता गरजेची असल्याचं ITCO पूर्व विभागाच्या संयोजक रुबी मुखर्जी यांनी म्हटलंय. भारतानं तिबेट प्रकरणी देखरेखीसाठी एका मंत्र्याची नियुक्ती करण्याबद्दल विचार करावा, जसं अमेरिकेनं केलंय, असा सल्लाही मुखर्जी यांनी यावेळी दिला.

कूल्लूमध्येही आंदोलन

दरम्यान, कुल्लू जिल्ह्यातही तिबेटीय नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी आवाज उंचावला. तिबेटीय समुदायाच्या हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत चीनविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

तिबेटीयन नागरिकांच्या या आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास चीनच्या दूतावासाकडून नकार देण्यात आला.

Pig Heart Transplant: डुक्कराचं हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णाचा दोन महिन्यांत मृत्यू
Ukraine Crisis: रशियाविरुद्ध झुंजणाऱ्या युक्रेनला अमेरिकेकडून १३.६ अब्ज डॉलरची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here