मुंबई: महाविकासआघाडी सरकारकडून शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यावेळी राज्य सरकार सामान्य नागरिक, उद्योग क्षेत्र, शेतकरी आणि अन्य क्षेत्रांसाठी काय घोषणा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील (Petrol & Diesel Rate) कर कमी करणार असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात इंधनाच्या उत्पादन शुल्कात मोठी कपात केली होती. राज्यांनीही अशीच करकपात करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनीही हाच कित्ता गिरवत इंधनावरील व्हॅट कमी केला होता. एवढेच नव्हे तर दिल्लीमध्येही केजरीवाल सरकारने इंधनावरील करात लक्षणीय घट केली होती. मात्र, ठाकरे सरकारने इंधनावरील व्हॅट कमी करण्यास नकार दर्शविला होता. त्यामुळे भाजपने राज्य सरकारवर टीकाही केली होती. मात्र, ठाकरे सरकार महसूली उत्पन्नाचे कारण देत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात ठाकरे सरकारकडून इंधनावरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे. (Petrol and Diesel rates in Maharashtra)

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधिमंडळात ज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला होता. त्यानुसार २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्याच्या विकास दरात १२.१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या वाढलेल्या उत्पन्नाचा वापर करून ठाकरे सरकार इंधन करावरील दरात कपात करू शकते, असा कयास आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उभारी; २०२१-२२मध्ये विकास दरात १२. १ टक्क्यांनी वाढ
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) वर्ष २०२२-२३ वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करतील. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील दुपारी दोन वाजल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात होईल. त्यामध्ये सरकार कोणत्या घोषणा आणि तरतुदी करणार, हे पाहावे लागेल.

निकालानंतर पेट्रोलियम कंपन्यांचे वेट अँड वॉच धोरण

कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील महागाई येत्या काही दिवसांत कमी होईल, या आशेने पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी इंधन दर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नईसह कोलकात्यात आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. दरवाढ टळल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पाच राज्यांतील निवडणूक प्रक्रियेमुळे केंद्र सरकारने तब्बल चार महिने इंधन दरवाढ रोखून ठेवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here