मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर दिला असल्याचे पवार यांनी सुरुवातीला सांगितले. अर्थसंकल्प सादर करताना, आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली. अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्यााची माहितीही त्यांनी दिली.
Home Maharashtra Maharashtra Budget Session 2022 Mahavikas Aghadi Government Ajit Pawar Announced Hospitals For...
Maharashtra Budget Session 2022 Mahavikas Aghadi Government Ajit Pawar Announced Hospitals For Womens In All Districts In State | ठाकरे सरकारची महिलांना मोठी भेट; सर्व जिल्ह्यांमध्ये महिला रुग्णालये
मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज, शुक्रवारी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget session 2022) महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारनं महिलांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी रुग्णालये उभारणार असल्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली.