कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास , दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुरुवारी केंद्र सरकारने महाराष्ट्राची ३००० कोटी रुपयांची थकबाकी दिली. मात्र, अद्याप २६५०० कोटी रुपयांची थकबाकी कायम असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
ठाकरे सरकारची महिलांना मोठी भेट
सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर केले. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्यााची माहितीही त्यांनी दिली.
ठाकरे सरकार एसटीलाही पंचत्वात विलीन करेल, अशी भीती वाटते: फडणवीस
कळसूत्री ठाकरे सरकारने पंचसूत्री अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारला आता पंचसूत्री वगैरे गोष्टी आठवायला लागल्या आहेत. मला भीती वाटते की, ठाकरे सरकार एसटी महामंडळालाही पंचत्वात विलीन करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.