जळगाव : यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीचे खोदकाम करताना दोन मजूर विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. बापू काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल (दोघेही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर) अशी मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर, मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, किरण चाटे, विकास सोनवणे, उमेश सानप हे घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री अंधारात मृतदेहांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे शोध घेणे शक्य न झाल्याने शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.