पंतप्रधान मोदींच्या या रोड शो मध्ये जय श्रीराम, भारत माता की जय आणि मोदी… मोदी… च्या घोषणा देण्यात आल्या. रस्त्याच्या दुतर्फा यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान मोदी उपस्थित नागरिकांना अभिवादन करत होते.
रोड शो नंतर पंतप्रधान मोदी भाजप कार्यालयात पोहोचले. दुपारी दीड वाजता पंतप्रधान मोदींचा ताफा कार्यालयात पोहोचला. जवळपास ४ लाख नागरिक रोड शोमध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींवर यावेळी पुष्प वर्षाव करण्यात आला. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान मोदींचा रोड शो आयोजित करत गुजरात भाजपने निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे.
वाराणसीच्या रॅलीत बनारसी गमचा, बनारसी टोपीमध्ये
उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी ४ मार्चला पाच वर्षांनंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये रोड शो केला होता. यावेळी तो टिपिकल बनारसी रंगात दिसून आले. त्यांनी बनारसी गमचा घातला होता. तसेच थंडीत घातल्या जाणाऱ्या खासीदीचे गरम कपडे आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारखीच पण भगव्या रंगाची टोपी घालून ते अनोख्या पोषाखात दिसले. या रोड शोमध्ये वोकल फॉर लोकल आणि बनारसीपन असा संदेश देण्यात आला.