बीजिंग, चीन :

चीनच्या पूर्वेत्तर भागातील चांगचून शहरात कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ९० लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात दोन करोना संक्रमित रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनानं हे आदेश दिले आहेत. यावरून करोनाविरुद्ध चिनी प्रशासनाच्या सक्तीचा अंदाज येऊ शकतो.

आवश्यकता भासली तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला प्रशासनानं नागरिकांना दिला आहे. याच दरम्यान सरकारनं शहरात मोठ्या प्रमाणात करोना टेस्टिंगही सुरू केलंय. संक्रमित आढळून आलेल्या रुग्णांना क्वारंटीन केलं जातंय. सोबतच, राजधानी बीजिंगसहीत इतर मोठ्या शहरांतही सरकारची रुग्णांवर करडी नजर आहे.

Inflation in Sri Lanka: साध्या ब्रेडसाठी १५० रुपये, महागाईनं ‘या’ देशाचे नागरिक होरपळले
Independent Tibet:भारतानं ‘स्वतंत्र तिबेट’ला मान्यता द्यावी, चीनविरुद्ध उंचावला तिबेटचा आवाज
लॉकडाऊन दरम्यान चांगचून शहराच्या नागरिकांना आपल्या घरातच बंद राहावं लागणार आहे. तसंच तीन टप्प्यांतील सामूहिक चाचणीतूनही जावं लागणार आहे. सर्व गैर-आवश्यक व्यवसाय बंद करण्याचे आदेशही प्रशासनाकडून देण्यात आलेत. पुढच्या आदेशापर्यंत ट्रान्सपोर्ट सेवाही निलंबित करण्यात आलीय. या शहरात लॉकडाऊन लावलं नाही तर करोना संक्रमण इतर शहरांतही फैलावण्याचा धोका चीनला वाटतोय.

उल्लेखनीय म्हणजे, चीनमध्ये शुक्रवारी देशभरात स्थानिक ट्रान्समिशनचे ३९७ नवे रुग्ण आढळून आले होते. यातील ९८ रुग्ण केवळ जिलिन प्रांतात आढळले होते. चांगचून शहरातून केवळ दोन रुग्ण समोर आले होते.

इथे करोना संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेता चीनच्या करोना लसीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. करोनाच्या नव्या व्हेरियंटला रोखण्यात चिनी लस अप्रभावी ठरतेय.

Ukraine Talks with Russia: तुर्कीत पार पडलेली रशियासोबतची चर्चा निष्फळ, युक्रेनची माहिती
Pig Heart Transplant: डुक्कराचं हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णाचा दोन महिन्यांत मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here