अमरावती : महाविकास आघाडी शासनाचा अर्थसंकल्प सामाजिक न्याय, समानता, शिक्षण, आरोग्य, महिला-बालकांना योग्य प्रतिनिधित्व देणारा अर्थसंकल्प आहे. उद्योग – व्यवसायासाठी पोषक वातावरण देणारा तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. महिला बाल विकास विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे वर्ष महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, महिला व बालविकास, तसेच सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग या पंचसूत्रीवर आधारलेला असून सर्व क्षेत्रांना न्याय मिळवून देणारा अर्थसंकल्प धरला असून अमरावती जिल्ह्याच्या पदरी हा विकास आला आहे.
– पोहरा येथे शेळी समूह योजना, अमरावती विमानतळ विकासाची तरतूद
– अमरावतीत होणार अत्याधुनिक दर्जाचे ट्रामा केअर सेंटर
– आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठा निधी
– अमरावती जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठया निधीची तरतूद करण्यात आली आहे.
– मोझरीत शैक्षणिक सुविधांसाठी निधीची तरतूद
– महिला व बालकांच्या विकासासाठी मोठा निधी
– पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना
– नागरी बालविकास केंद्र उभारणार