मिळालेल्या माहितीनुसार, गाणगापूर येथील दत्त महाराजांचं दर्शन घेऊन भाविक परत येत होते. मात्र गाणगापूर-सोलापूर मार्गावर कर्नाटक हद्दीतील बळोरगी गावाच्या परिसरात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अर्णव वीर, हिराबाई वीर, छाया बाबासाहेब वीर यांनी आपला जीव गमावला. तसंच सायली बाबासाहेब वीर आणि चैत्राली दिनकर सूर्यवंशी या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताबाबत कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. भीषण अपघाताने गाडीचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्यानंतर दोन जखमींना तातडीने अफझलपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, या अपघाताबाबत अफजलपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.