मुंबई : ‘उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत सामान्य नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. या विजयाने हुरळून न जाता मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
गोवा निवडणूक लढविण्यास गेलेल्या महाराष्ट्रातील काही पक्षांचा पुरता धुव्वा उडाला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची लढाई ‘नोटा’शी आहे, हे माझे भाकीत गोव्यातील मतदारांनी खरे ठरवले. गोव्यातील विजयात महाराष्ट्रातून गेलेल्या खासदार, आमदार, या लोकप्रतिनिधींचा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचाही वाटा आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.