जीनिव्हा, स्वित्झर्लंड :

रशियाने आक्रमण केल्यापासून गेल्या दोन आठवड्यांहून अधिक कालावधीमध्ये युक्रेनमधून २५ लाख नागरिकांनी स्थलांतर केले असल्याची माहिती ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन‘ने (आयओएम) शुक्रवारी दिली. शुक्रवारी सकाळपर्यंत अद्ययावत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, युक्रेनच्या १५ लाखांहून अधिक नागरिकांनी शेजारच्या पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे. याशिवाय युक्रेनव्यतिरिक्त अन्य देशांच्या एक लाख १६ हजार नागरिकांनी स्थलांतर केले असल्याचे ‘आयओएम’चे प्रवक्ता पॉल डिल्लॉन यांनी सांगितले. तर, २० लाख नागरिक अद्यापही युक्रेनमध्येच अडकून पडले असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिप्पो ग्रँडी यांनी सांगितले.

Coronavirus in China: ९० लाख लोकसंख्या, २ करोना संक्रमित रुग्ण; संपूर्ण शहर लॉकडाऊन
Inflation in Sri Lanka: साध्या ब्रेडसाठी १५० रुपये, महागाईनं ‘या’ देशाचे नागरिक होरपळले
‘स्वयंसेवी लढवय्यां’ची रशियाच्या लष्कराला साथ

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तथाकथित ‘स्वयंसेवी लढवय्यां’ना युक्रेनमध्ये आणण्याचे आदेश दिले आहेत. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगु म्हणाले, की स्वयंसेवी लढवय्ये म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या १६ हजारहून अधिक जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये इस्लामिक स्टेटविरोधात रशियाला मदत करणाऱ्या पश्चिम आशियातील देशांमधील नागरिकांचा समावेश आहे.

निर्बंधांवर चीनची टीका

युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चीनने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली आणि शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी सकारात्मक भूमिकेतून मदत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याच वेळी अमेरिका आणि युरोपीय महासंघाने रशियावर लादलेल्या निर्बंधांवर टीका केली. करोनाच्या संकटातून सावरणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला या निर्बंधांमुळे धक्का बसेल, असे चीनचे पंतप्रधान ली कछियांग यांनी म्हटले आहे.

Independent Tibet:भारतानं ‘स्वतंत्र तिबेट’ला मान्यता द्यावी, चीनविरुद्ध उंचावला तिबेटचा आवाज
Ukraine Talks with Russia: तुर्कीत पार पडलेली रशियासोबतची चर्चा निष्फळ, युक्रेनची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here