वाशिम : रिसोड तालुक्यातील एका निर्दयी बापाने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत खड्ड्यात पुरल्याची घटना काल ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. सुरेश प्रभाकर घुगे वय २७ वर्ष असं निर्दयी बापाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश हा आपली पत्नी कावेरी सोबत ‘वाडी वाकद’ शिवारात शेतात गोठ्यावर राहत असे. त्यांना तीन मुली आहेत. सुरेश हा नेहमी कावेरीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून नेहमीच दोघांची भांडणे व्हायची, त्याला दारूचे व्यसन जडले आहे.

धक्कादायक! गुटख्याची सुपारी अन्ननलिकेत अडकली, ठसला लागला आणि…
काल पुन्हा त्यांचं कडाक्याचं भांडण झालं त्यात सुरेशने कावेरीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळत गेली व तिने सर्व हकीकत आपल्या दिराला सांगितली. त्यानंतर तिचा दीर व गावातील भावकीची काही मंडळी हे शेतात गोठयावर गेले असता तिथे चिमुकली कुठेही दिसत नव्हती. याबाबत त्यांनी सुरेशला विचारणा केली तर त्याने ही आपली पोरगी नसून आपण तिला जिवंत गाडून टाकले असल्याचे सांगितले. त्याने दाखवलेला खड्डा गावकऱ्यांनी उकरून पाहिला असता त्यात चिमुकली निपचित पडली होती. तिचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आरोपी निर्दयी पिता सुरेशला अटक केली आहे.

कोकणात धक्कादायक प्रकार, शिमगोत्सवाच्या बैठकीत असं काही घडलं की नागरिकांमध्ये भीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here