नवीन सोया उत्पादनांसाठी तयार केली जात आहेत मानके
बीआयएसने म्हटले आहे की, सोया उत्पादनांच्या गुणवत्तेची खात्री करण्याशिवाय त्यांची भौतिक, रासायनिक आणि बॅक्टेरियोलॉजिकल मानके राखण्यासाठी चाचणी पद्धतींचे मानकीकरण आवश्यक आहे. सोया पीठ, सोया दूध, सोया नट्स आणि सोया बटर यांसारख्या उत्पादनांसाठी याने आधीच भारतीय मानके जारी केली आहेत. नवीन सोया उत्पादनांसाठी मानके तयार करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
दरम्यान, आयएसआय (ISI) मार्क हे १९५५ पासून भारतातील औद्योगिक उत्पादनांसाठी मानक अनुपालन चिन्ह (स्टँडर्ड कम्पलायन्स मार्क) आहे. मार्क प्रमाणित करते की, एखादे उत्पादन हे भारताची राष्ट्रीय मानक संस्था भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे विकसित केलेल्या भारतीय मानकाशी (IS) अनुरुप आहे.
सोया उत्पादनांवरील भारतीय मानकाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये बीआयएसने सांगितले की, व्हेजिटेबल प्रोटिन जे सोया नगेट्स म्हणून ओळखले जाते, सोया दूध, टोफू, सोया दही यांसारख्या उत्पादनांना पसंती मिळत आहे.