नवी दिल्ली : दिल्लीच्या गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत होरपळून सात रहिवाशांचा मृत्यू झालाय. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. आगीमुळे जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

आगीत जवळपास ३० झोपड्या जळून राख झाल्यात. अग्निशमन दलानं या आगीतून सात मृतदेह बाहेर काढले. या घटनेवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दु:ख व्यक्त केलंय.

उत्तर पूर्व (ईशान्य) दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त देवाश कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मदत यंत्रणा घटनास्थळी पोहचली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय.

दिल्ली अग्निशमन दलाला रात्री जवळपास १.०० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अग्निशमनदलाचे जवान ताबडतोब घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यानंतर आग विझवण्यासाठी रात्रीचे ४.०० वाजले होते.

प्लास्टिक कारखान्याला लागलेल्या आगीनंतर…

चार दिवसांपूर्वी दिल्लीच्या बवाना भागातील एका प्लास्टिकच्या कारखान्यालाही आग लागल्याची घटना समोर आली होती. यामध्ये कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नव्हतं. त्यानंतर गोकुळपुरी भागात लागलेल्या आगीकडे या वर्षातील मोठी घटना म्हणून पाहिलं जातंय.

काँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वस्थता, गांधी कुटुंबाचा बचावही अवघड
pm modi gujarat : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर PM मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद, जेवणही केले….
helicopter crashe मोठी दुर्घटना : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; एका पायलटचा मृत्यू, दुसरा जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here