वॉशिंग्टन, अमेरिका :

अमेरिकेत वर्णभेदाचा वाद नवा नाही. याच वादाला आणखीन फोडणी घालणारी एक नवी घटना समोर येतेय. जगभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या ‘ब्लॅक पँथर‘ या चित्रपटाचा दिग्दर्शक रायन कुग्लेर (Ryan Coogler Arrest) याला पोलिसांनी चक्क दरोडेखोर समजून अचक केली.

ही घटना ‘बँक ऑफ अमेरिका‘शी संबंधित होती. पोलिसांनी बँकेत दरोडा पडल्याची माहिती अटलांटा पोलिसांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी रायन कुग्लेर याला ताब्यात घेतलं. नंतर मात्र, आपल्याकडून ‘चूक’ झाल्याचं सांगत पोलिसांनी रायनला सोडून दिलं.

ही घटना ७ जानेवारी रोजी घडल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक रायन कुग्लेर आपल्या खात्यातून पैसे काढण्यसाठी ‘बँक ऑफ अमेरिके’च्या एका शाखेत दाखल झाला होता. पैसे काढण्यासाठी त्यानं दिलेल्या स्लीपवर १२ हजार डॉलर (९ लाख रुपये) चा आकडा लिहिला होता.

Ukraine Crisis: ‘किती तास उरलेत सांगता येणार नाही’, रशियन सैन्यानं घेरल्यानंतर झेलेन्स्की यांचे उद्गार
युक्रेनच्या शहर प्रमुखाचं अपहरण, झेलेन्स्कींकडून रशियाची ‘दहशतवाद्यां’शी तुलना

बँकेच्या नियमानुसार, ग्राहक पैसे काढताना त्यांची रक्कम १० हजार डॉलरहून अधिक असेल तर थेट बँकेतील अलार्म वाजायला सुरूवात होते. रायन काऊंटरवर पोहचला तेव्हाही अशाच पद्धतीनं अलार्मा वाजायला सुरूवात झाली आणि अचानक घडलेल्या या प्रकारानं बँक कर्मचाऱ्याचा गोंधळ उडाला.

घाईघाईनं या कर्मचाऱ्यानं बँकेत दरोडा पडल्याची सूचना दिली. त्यानंतर बँकेत दाखल झालेल्या पोलिसांनी तत्काळ रायन कु्ग्लेर याला हातात बेड्या घालून अटक केली.

मात्र, पोलिसांच्या तपासात बँक कर्मचाऱ्याची चूक समोर आली. कुग्लेर याला आपण घाईघाईनं अटक करून चूक केल्याचं पोलिसांनी मान्य केलं. तसंच बँक कर्मचाऱ्यानंही कुग्लेर आणि पोलिसांची माफी मागितली.

कुग्लेर यानं उपस्थित अधिकाऱ्यांची नावं आणि बॅच क्रमांकही घेतले. आपल्यासोबत जे घडलं ते घडायलं नको होतं, अशी प्रतिक्रिया या प्रकारानंतर संतप्त झालेल्या कुग्लेरनं व्यक्त केली.

Coronavirus in China: ९० लाख लोकसंख्या, २ करोना संक्रमित रुग्ण; संपूर्ण शहर लॉकडाऊन
Inflation in Sri Lanka: साध्या ब्रेडसाठी १५० रुपये, महागाईनं ‘या’ देशाचे नागरिक होरपळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here