मुंबई : हिंदी सिनेमाविश्वामध्ये अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी एन्ट्री केली आहे. त्यामुळे अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाकार एकत्र दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता वरुण धवन नॅशनल क्रश दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदनाबरोबर डान्स करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा वरुण धवन सामंथा प्रभूबरोबर दिसला. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सामंथा प्रभू आणि वरुण धवन हे दोघंजण मुंबईतील अंधेरीत एकत्र दिसले होते. त्यांच्याबरोबर दिग्दर्शक राज निदिमोरूसुद्धा होते. या दोघांना एकत्र पाहून तिथं असलेल्या फोटोग्राफर्सनी त्या दोघांना घेरलं. या दोघांचे ते फोटो काढू लागले. या दोघांचे फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. सभोवताली झालेली ही गर्दी पाहून सामंथा थोडी अस्वस्थ झाली. सामंथाची अवस्थता पाहून वरुण तिच्या मदतीला धावला. वरुणनं फोटोग्राफर्सना हाताळत असताना थोडी त्यांची मस्करी देखील केली. त्याबरोबरच वरुणनं सामंथाला सावरत तिच्या कारपर्यंत तिला सोडलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वरुण धवन पापाराझींना म्हणतो की, ‘अरे तुम्ही लोक घाबरवू नका, कशाला घाबरवताय तिला’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. यावेळी सामंथानं ग्रे-ब्लू कलरचं जॅकेट तर वरुणनं केशरी रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. वरुणचं हे मजेशीर बोलणं ऐकून सामंथाला तिचं हसू आवरत नाही. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर युझर्सदेखील या व्हिडिओवर भरभरून कमेन्ट करत आहेत. एका युझर्सनं लिहिलं आहे की, ‘पहिल्यांदा रश्मिका आणि आता सामंथा… वाह वरुणभाई मजा आहे तुझी…’ तर आणखी एका युझरनं लिहिलं की, ‘ वरुणभावा, दाक्षिणात्य सिनेमात जाण्याचा प्रयत्न करत आहेस का तू?’ एका युझरनं लिहिलं आहे की, ‘ ज्या पद्धतीनं तू हात पसरवून तिला प्रोटेक्ट केलं आहे परंतु तिला स्पर्श देखील केलेला नाही. मला ते पाहून खूप बरं वाटलं.’ तर दुसरा एक युझर लिहितो,’तू तर चौकीदार धवन झाला आहेस’. अशा विविध कमेन्ट केल्या आहेत.

सामंथा प्रभू वरुण धवन

वरुण धवन, सामंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांना एकत्र पाहून चाहते अंदाज लावत आहेत की हे दोघंही लवकरच एखादा चित्रपट किंवा सीरिज करण्याच्या तयारीत आहेत. कारण गेल्या वर्षी अशी बातमी आली होती की दोघंही अॅमेझॉन प्राइमच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये काम करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात वरुण आणि सामंथा यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here