मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं होतं. यानंतर आता निलेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेसनं कडक शब्दांत उत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याची निलेश राणेंची पात्रता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर आज, शनिवारी टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांच्यावर टीका-टिप्पणी करण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर डागली तोफ
Devendra Fadnavis : पोलीस चौकशी होणार; फडणवीसांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम केले रद्द, म्हणाले…

गेली ५५ वर्षे पवार यांनी महाराष्ट्राची आणि देशाची सामाजिक कार्यातून आणि राजकारणाच्या माध्यमातून अविरत सेवा केली आहे आणि आजही ते करत आहेत. हे कदाचित निलेश राणेंना माहिती नाही. पवार यांच्यावर टीका करण्याची पात्रता निलेश राणेंची नाही. राणेंची तेवढी पात्रता असती तर, ते आज यशस्वी राजकारणी असते, असा जोरदार टोला तपासे यांनी लगावला.

फडणवीसांसारखे २०० जण शरद पवारांकडून ट्रेनिंग घेऊन गेले असतील | रुपाली पाटील

काय म्हणाले होते निलेश राणे?

निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता, मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा? नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो, असे राणे म्हणाले होते. नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, असंही ते म्हणाले होते.

नवाब मलिकांना एवढं का लाडावलंय? ते काय देतात हे शरद पवार सांगतील | निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here