Nitesh Rane and Nilesh Rane | काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी आझाद मैदानात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी नितेश राणे यांची जीभ घसरली होती.

 

Nitesh Rane Nilesh Rane (1)
नितेश राणे आणि निलेश राणे

हायलाइट्स:

  • मरिनड्राईव्ह पोलिसांनी नारायण राणे यांच्या दोन्ही सुपूत्रांवर गुन्हा दाखल केला आहे
  • देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले बेछुट आरोप भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण,याप्रकरणात मरिनड्राईव्ह पोलिसांनी नारायण राणे यांच्या दोन्ही सुपूत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे (Nitesh Rane) यांना झालेली अटक, अधीश बंगल्यावरील कारवाईची टांगती तलवार आणि त्यानंतर आता नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी नुकतीच आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले होते. तर नितेश राणे यांची आझाद मैदानातील मोर्चादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Police file FIR against BJP MLA Nilesh Rane and Nitesh Rane)

BJP Morcha: महाविकासआघाडीवर नागासारख्या बसलेल्या शरद पवारांपर्यंत आपल्याला संदेश पोहोचवायचाय; नितेश राणेंची जीभ घसरली
काय म्हणाले होते निलेश राणे?

निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे शरद पवार नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवारच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असं खळबळजनक वक्तव्य निलेश राणेंनी केलं होतं. ज्याने बॉम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले. दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, त्या नवाब मलिक यांना पाठीशी घालतात आणि अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घेता, मग नवाब मलिक यांच्याशी तुमचे संबंध काय? कोण लागतो नवाब मलिक शरद पवारांचा? नवाब मलिक पवार कुटुंबीयांसाठी काही खास आहेत का? की नवाब मलिक खरे बोलले तर, पवार यांच्याबद्दल माहिती उघड होईल, अशी त्यांना भीती आहे? असा मला संशय वाटतो, असे राणे म्हणाले होते. नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही, हे पवारच सांगतील, असंही ते म्हणाले होते.
फडणवीसांना पोलिसांची नोटीस, नितेश राणेंची सरकारला धमकी, म्हणतात, ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट…!’
देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी

फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबई पोलिसांकडून रविवारी चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातील दौरा रद्द करावा लागला होता. मुंबई सायबर पोलीस त्यांच्या चौकशीसाठी ‘सागर’ या निवासस्थानी जाणार आहेत. राज्याच्या गृहविभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे. माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दिवसभर मी घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात, असं फडणवीसांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mumbai police file fri against bjp nitesh rane and nilesh rane over controversial statement about sharad pawar and dawood
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here