Mumbai Local Train | महिला प्रवाशांच्या डब्यात सीसीटीव्ही असून देखील आरोपीनं हल्ला केल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आता या प्रकरणात रेल्वे पोलीस काही ठोस कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- महिलांच्या प्रत्येक डब्यात एक पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
- हा हल्ला झाला त्यावेळी पोलीस कुठे होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे
या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु, यानिमित्ताने मुंबईतील लोकल ट्रेन महिलांसाठी पुरेशा सुरक्षित नसल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वी महिलांवरील हल्ल्याच्या घटना लक्षात घेता महिलांच्या प्रत्येक डब्यात एक पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा हल्ला झाला त्यावेळी पोलीस कुठे होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आरोपी महिलांच्या डब्यात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काही ठोस कारवाई होणार का, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : girl attacked with blade on mumbai local train western railway charni road railway station
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network