Nitesh Rane | संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना झालेली अटक, अधीश बंगल्यावरील कारवाईची टांगती तलवार आणि त्यानंतर आता नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

 

Nitesh RAne Uddhav
Nitesh Rane: नितेश राणे यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना टोलाही लगावला.

हायलाइट्स:

  • आमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, आम्ही काही चुकीचं बोललो का?
  • आमची भाषा दंगलीला चिथावणी देणार नव्हती तर आम्ही हिंदुत्वाची बाजू घेऊन बोललो
मुंबई: ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी आता त्यांच्या केबिनमधील महात्मा गांधीजींची तसबीर काढून त्याठिकाणी दाऊद इब्राहिमचा फोटो लावावा. एवढंच कशाला राज्य सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण पुरस्कारही देऊन टाकावा, अशी खोचक टिप्पणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून नितेश राणे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (BJP MLA Nitesh Rane takes a dig at Mahavikas Aghdi)

यावेळी नितेश राणे यांनी म्हटले की, आमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे, आम्ही काही चुकीचं बोललो का? आमची भाषा दंगलीला चिथावणी देणार नव्हती तर आम्ही हिंदुत्वाची बाजू घेऊन बोललो. नवाब मलिक मुस्लीम कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदशी जोडलं जातं, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर मी एवढंच विचारलं की, मग तुम्ही अनिल देशमुख यांचा राजीनामा ते हिंदू असल्यामुळे घेतला का? आम्ही केवळ हिंदुत्वाची बाजू घेतली. देशात हिंदू-मुस्लीम दंगल होऊ नये, ही आमचीही भूमिका आहे. त्यामुळे आमचा दंगल भडकवण्याचा उद्देश नव्हता. परंतु, आम्ही हिंदूंवर अन्याय होऊन देणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची चौकशी, बडे नेते सागर बंगल्यावर जाणार; राज्यभरात भाजपचं आंदोलन
यावेळी नितेश राणे यांनी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांना टोलाही लगावला. नवाब मलिक यांनी दाऊदशी आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे आहेत. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपापल्या केबिनमध्ये महात्मा गांधींजी यांच्याऐवजी दाऊदचा फोटो लावावा, असे नितेश यांनी म्हटले. तसेच पोलिसांच्या नोटीसला मी जे काय उत्तर द्यायचं आहे, ते देईन. अलीकडे आम्हाला रोज सकाळी नोटीस येण्याची सवयच लागली आहे. महाराष्ट्रात सत्य बोलणे गुन्हाच झाला आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

सोमय्या, राणे आणि आता थेट फडणवीस; ठाकरेंनीही भाजपवर त्यांचाच डाव टाकला?

राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेले बेछुट आरोप नारायण राणे यांच्या दोन्ही सुपूत्रांना महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मरिनड्राईव्ह पोलिसांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हे देखील नौपाडा पोलीस ठाण्यात राणे बंधूविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे याठिकाणीही नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : thackeray government cabinet ministers should put dawood photo instead of mahatma gandhi in their cabins says bjp mla nitesh rane
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here