मुंबई- विवेक अग्निहोत्रीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ चं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतीच सिनेमाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएम मोदींनीही ‘द काश्मीर फाइल्स’ चं कौतुक केलं. त्यानंतर निर्मात्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अग्रवाल यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आभार मानत फोटो शेअर केले. तेव्हापासून ट्विटरवर चाहते ‘द काश्मीर फाइल्स’ साठी सेलिब्रेशन करत आहेत आणि ‘द कपिल शर्मा शो‘ वर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.

आता कंगना रणौतच्या ‘लॉकअप’मध्ये मिलिंद सोमण होणार कैदी? घेणार वाईल्ड कार्ड एण्ट्री

विवेक यांनी काही दिवसांपूर्वी कपिल शर्माने त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यास नकार दिल्याचा खुलासा करून अनेकांना धक्का दिला होता. यानंतर चाहते संतापले आणि त्यांनी ट्विटरवर कपिल विरोधात ट्वीट करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून लोक ‘द कपिल शर्मा शो’ वर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत. प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून कपिलने या प्रकरणावर मौन सोडलं आणि एकतर्फी बोलण्यावर विश्वास ठेवू नका असेही म्हटलं. पण तरीही लोक नाराज आहेत.

द काश्मीर फाइल्स

‘द काश्मीर फाईल्स’ चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या चित्रपटाला IMDB वर १०/१० रेटिंग मिळाले आहे, जे याआधी क्वचितच कुठल्याही हिंदी सिनेमाला मिळाल असेल. त्याचवेळी, जेव्हा लोकांनी पीएम मोदींनीही ‘द काश्मीर फाइल्स’चं कौतुक केल्याचं पाहिलं, तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी द कपिल शर्मा शो वर राग काढला. लोक #BoycottKapilSharmaShow ट्रेंड करत आहेत.

द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स

एका यूझरने लिहिले की, ‘वा… कपिल शर्मा नरकात जा. ‘द काश्मीर फाइल्स’ चं सर्वात मोठं प्रमोशन इथे आहे. आणखी एका यूझरने लिहिलं की, ‘कपिल शर्मा मला तुझा शो आवडतो. पण आता तू तुझ्या शोमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचं प्रमोशन केलं नाहीस म्हणून मी तुझा शो कधीच पाहणार नाही.’ आणखी एका युझरने आपलं मत व्यक्त करताना लिहिलं की, ‘आता भारताचे सर्वात मोठे आयकॉन (पीएम नरेंद्र मोदी) ‘द काश्मीर फाइल्स’ चं प्रमोशन करत आहेत. जो एक मास्टर पीस आहे.’

‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला. सिनेमात काश्मिरी पंडितांचं दुःख आणि त्यांनी भोगलेल्या यातना दाखवण्यात आल्या आहेत. यात अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकरसह अनेक कलाकार आहेत. अवघ्या ७०० स्क्रीन्समध्ये रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे ३.५ कोटींची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here