मुंबई- आणि हे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. ते अनेकदा एकमेकांसोबतचे रोमॅण्टिक फोटो शेअर करतात. दोघांचं लग्न झाल्यापासून ते एकमेकांवरचं प्रेम दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. अलीकडेच, कतरिनाने (कतरिना कैफ इंस्टाग्राम) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विकीच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की, ‘विकी आता थोडी लवचिकता आली आहे.’

या महिन्याच्या सुरुवातीला, महिला दिनानिमित्त, विकीने चाहत्यांना त्याची आई वीणा कौशल आणि पत्नी कतरिना कैफ यांचा एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘माझी ताकद. माझं जग.’

कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला लग्न केलं. दोघांनी राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं. या लग्नाला त्यांचे जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, विकी सध्या त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याने अलीकडेच सारा अली खानसोबत लक्ष्मण उतेकरांच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. याशिवाय त्याच्याकडे ‘गोविंदा मेरा नाम’ आणि ‘सॅम बहादुर’ हे दोन महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहेत. दुसरीकडे, कतरिनाने विजय सेतुपतीसोबत ‘मेरी ख्रिसमस’ चं शूटिंग सुरू केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here