Shivsena vs BJP | भाजपला चार राज्यांत विकासाच्या मुद्द्यावर विजय मिळाला असे आता कितीही सांगितले तरी खरे वाटणार नाही. भाजपने लोकांची विचार करण्याची क्षमताच मारून टाकली आहे. त्यामधूनच हा विजय मिळाला आहे.

 

Sanjay Raut Modi
Shivsena vs BJP: चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होत नसतो.

हायलाइट्स:

  • प्रकृतीने गलितगात्र झालेले लालू यादव ऐन निवडणुकीत तुरुंगात पाठवले जातात
  • त्याचवेळी सर्वगुणसंपन्न बाबा राम रहिम यांना तुरुंगातून झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेसह बाहेर काढले जाते.
मुंबई: देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला सध्या तरी तोड आणि जोड नाही. मोदी-शाह आणि त्यांची झुंड निवडणुकीत अत्यंत बेफामपणे उतरते. अशाप्रकारचे निवडणूक कौशल्य सध्याच्या काळात क्वचितच दिसते. भाजप (BJP) राजकारणाच्या किंवा निवडणुकीच्या मैदानात जिंकण्यासाठीच उतरतो, विरोधकांचा पराभव करण्यासाठी नाही. राजकीय विरोधकांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणे किंवा खात्मा करणे, हा त्यांचा हेतू असतो. ही भूमिका संसदीय लोकशाहीला अत्यंत घातक आहे, अशी टिप्पणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. (Shivsena criticize BJP over politics in UP assembly Election 2022)
प्रवीण चव्हाणांनी आरोप केलेले तेजस मोरे पहिल्यांदाच समोर; केला ‘हा’ धक्कादायक खुलासा
तसेच भविष्यातील विरोधी पक्षांच्या नेतृत्त्वाविषयीही ‘सामना’तून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले ते खरे आहे. विरोधी पक्षांत तगडे नेतृत्त्व नाही. त्याचाच फायदा भाजपला होत आहे. हेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वमान्य नेतृत्व लोकांनी निर्माण केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होत नसतो. देशासाठी लढाई ही २०२४ मध्येच होईल आणि तेव्हाच ती लढली जाईल, असे ‘सामना’त म्हटले आहे.
मतदारांना धमकावण्यासाठी काही नेते विभागातील पाणी बंद करतात; मी त्यांची हाडं मोडून टाकेन: जितेंद्र आव्हाड
भाजपच्या सोयीस्कर राजकारणावर टीका

प्रकृतीने गलितगात्र झालेले लालू यादव ऐन निवडणुकीत तुरुंगात पाठवले जातात व त्याचवेळी सर्वगुणसंपन्न बाबा राम रहिम यांना तुरुंगातून झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेसह बाहेर काढले जाते. यावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. प्रश्न विचारला तर त्याला देशद्रोही किंवा दाऊदचे हस्तक ठरवण्यात येईल. ओवेसी हे उत्तर प्रदेशात मुस्लिमांची मते घ्यायला नव्हे तर हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अवतरले होते. प्रसारमाध्यमांनी बसपला भाजपची बी टीम ठरवल्याने बसपचा पारंपारिक मुस्लीम मतदार समाजवादी पक्षाकडे वळाला. तर समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास जंगलराज निर्माण होईल, अशी भीती असलेल्या इतर मतदारांनी भाजपला मतदान केले. समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, असे वक्तव्य मायावती यांनी निवडणुकीच्या काळात केले होते. ही त्यांच्या व्होटबँकेला दिलेली एकप्रकारची सूचनाच होती, असेही ‘सामना’त म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : currently no one can match with pm narnera modi leadrship says shivsena
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here