यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसच्या मुद्द्यावरूनही राज्य सरकारला लक्ष्य केले. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा आहे. आम्ही यावर विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एक प्रयोग म्हणून मतपत्रिकेवर (बॅलेट पेपरवर) घेण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आपण तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडू, असेही त्यांनी म्हटले होते. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या पाच ठिकाणांवर नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये पाच ठिकाणांपैकी चार ठिकाणांवर भाजपला भरघोस मत मिळाली. त्यामुळे जनतेमध्ये आणि इतर पक्षांमध्ये इव्हिएम मशीनबाबत संशयाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यातील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.