काही वर्षांपूर्वी जुईला प्रोलॅक्टीन ट्यूमर ( ) या आजाराचं निदान झालं होत. तेव्हापासून तिची या आजाराशी झुंज सुरू आहे. पथ्य, औषधं, वेगवेगळे उपचार, मानसिक आणि शारिरिक बदल या सर्व गोष्टींसोबत जुई काही वर्षांपासून जगतेय. असं असलं तरी तिनं तिचं अभिनय करिअर सोडलं नाही. ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिची काळजीनं विचारपूस सूरू आहे. यानतंर जुईनं इन्स्टाग्रावर आता हत्ती गेलाय, शेपुट राहिलंय, अशी स्टोरी शेअर करत मी लवकरच बरी होईन, असं म्हटलं आहे. मला छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी तुमचे आशिर्वाद हवेत, असंह जुईनं म्हटलं आहे.
जुईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर छोट्या पडद्यावरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहचली. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी कल्याणीची भूमिका साकारणारी जुई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. जुई फक्त अभिनेत्रीच नाही तर तिनं कथ्थकचं दोन वर्षे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं आहे. जुईला पाळीव प्राण्यांचे वेड असून मांजरींसोबतची काही फोटो , व्हिडिओ जुई शेअर करत असते.