मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीचा विनोदवीर असलेल्या भरत जाधवनं नुकताच सोशल मीडियावर एक खास आठवणीतील फोटो शेअर केला आहे. हा जुना फोटो पाहून तुमच्याही भुवया उंचावतील. तीस वर्षांपूर्वीच्या या फोटोत अभिनेते जयराज नायर, दिग्दर्शक केदार शिंदे आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत अभिनेता अंकुश चौधरी आहे.

या फोटोविषयी सोशल मीडियावर व्यक्त होताना भरत लिहितो, ‘हा फोटो खूप कमाल आहे. ‘महाराष्ट्राची लोकधारा’च्या वेळचा. साधारणतः ३० वर्षांपूर्वीचा. या बसमध्ये तीन जिवलग मित्र तीन वेगवेगळ्या विंडो सीटला बसलेले आहेत. तिघंही मराठी नाटक आणि लोककलेच्या प्रेमानं झपाटलेले.

आयुष्यात महत्त्वाच्या वळणांवर अशी योग्य माणसं भेटत गेली आणि प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर जगणं किती सुंदर हाऊ शकतं हे तिघांनीही अनुभवलंय..!

‘गुजरात दंगलींवर सिनेमा बनवला तर कुत्रंही जाणार नाही,’ अभिनेत्याला ‘द काश्मिर फाइल्स’ चं यश पाहवेना


‘ या फोटोवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here