औरंगाबाद : वंचित बहुजून आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची आज ( सोमवारी ) शहरातील आमखास मैदानावर सभा होणार होती. मात्र, सभेला काही तास शिल्लक राहिले असताना औरंगाबाद शहर पोलिसांकडून सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सभेत कर्नाटकची हिजाब गर्लचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली होती, ज्याला भाजपने विरोध केला होता.
शहरातील आमखास मैदानावर वंचित बहुजून आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. तर याचे सभेत कर्नाटकमधील हिजाब गर्लचा सत्कार करण्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली होती. त्यामुळे सभेसाठी दोन्ही पक्षाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, कालपर्यंत परवानगी न मिळाल्याने मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे नेते जावेद कुरेशी यांनी संबंधित पोलीस ठाण्यात धाव घेत परवानगीबाबत चर्चा केली. पण रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. Weather Alert : मुंबईसह ‘या’ शहरांमध्ये उष्णतेची तीव्र लाट; हवामान खात्याकडून नागरिकांना इशारा अन्यथा रस्त्यावर उतरू…
याप्रकरणी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर म्हणाले की, कर्नाटकमधील मुस्कान खान ( हिजाब गर्ल ) हिला शहरातील काही राजकीय पक्ष बोलवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे मुस्कान खानला शहरात बोलावून कुणीही जर राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा राजकीय पोळी शेखत असेल तर त्याला भाजप रस्त्यावर उतरून विरोध करेल. अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधीही खपवून घेणार नाही. तसेच मुस्कान खानला शहरात आशा कार्यक्रमासाठी परवानगी देऊ नये अशीही मागणी पोलीस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती केनेकर यांनी दिली.