मुंबई : राज्यात वारंवार हवामानात होणारे बदल आपण सगळ्यांनीच अनुभवले. पण आता कडक उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनो, उन्हाच्या झळा सोसण्यासाठी तयार राहा. येत्या २ दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असून मुंबईमध्ये कमाल तापमान घसरण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत उष्णतेची लाट येणार असून नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. येत्या २ दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान ३९°सेल्शिअस राहिल आणि नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंबंधी आयएमडीकडूनही माहिती देण्यात आली आहे.

मित्रासोबत पार्टी करणे तरुणीला चक्क सव्वा लाखात पडलं; आता आली डोक्याला हात मारण्याची वेळ
इतंकच नाहीतर, ‘कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५°C वर व कमाल तापमान किमान ३७°C असावे.’ असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनीदेखील यासंबंधी एक ट्विट करत मुंबईत उष्णता वाढणार असल्याची माहिती दिली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार आपण हवामानातील बदल पाहिले आहेत. सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यात आता उष्णाचा तडाखा वाढणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह, राज्यातील पुणे, कोकण, मराठवाडा-विदर्भातही उष्ण तापमान असेल. या वातावरणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी आणि काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्जाची परतफेड कशी करणार?; नैराश्यग्रस्त शेतकरी महिलेने उचलले टोकाचे पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here