या सगळ्यात शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाचे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शाजिया करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. शाजियाची नुकतीच टेस्ट केली असता त्यात ती पॉझिटिव्ह निघाली.
इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शाजिया करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर तिला तातडीने नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन विभागात भरती केलं आहे. सध्या शाजियाची प्रकृती स्थिर असून ती लवकरच या आजारातून मुक्त होईल अशी आशा कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे.
शाजिया करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता तिच्या कुटुंबियांचीही टेस्ट करण्यात येणार आहे. बॉलिवूडमध्ये शाजिया ही दुसरी अशी व्यक्ती आहे जी करोना पॉझिटिव्ह निघाली. याआधी बॉलिवूड गायिका कनिका कपूर पॉझिटिव्ह असल्याचं निदान समोर आलं होतं. सध्या कनिकावर लखनऊमध्ये उपचार सुरू आहेत. करीम मोरानी यांनी बॉलिवूडमध्ये चेन्नई एक्स्प्रेसशिवाय ‘दिलवाले’, ‘दम’, ‘हॅपी न्यू इअर’ यांसारख्या सिनेमांचीही निर्मिती केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times