इस्लामाबाद, पाकिस्तान :

भारताकडून ‘चुकून’ पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पडलेल्या क्षेपणास्त्र प्रकरणावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी प्रतिक्रिया दिलीय.

भारताकडून पाकिस्तानच्या पंजाबमध्ये क्षेपणास्र कोसळल्यानंतर पाककडून प्रत्यूत्तर देता आलं असतं परंतु, आम्ही संयम दाखवला, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलंय.

उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानातील विरोधी पक्षानं पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. यानंतर पंजाबच्या हफीजाबादमध्ये रविवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केलंय.

Ukraine Crisis: ‘किती तास उरलेत सांगता येणार नाही’, रशियन सैन्यानं घेरल्यानंतर झेलेन्स्की यांचे उद्गारPig Heart Transplant: डुक्कराचं हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णाचा दोन महिन्यांत मृत्यू
काय घडलं नेमकं?

९ मार्च रोजी हत्यारविरहीत भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्र पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं होतं. याबद्दल, पाकिस्तानी लष्करानं भारताकडून ‘एक फ्लाईंग ऑब्जेक्ट’ (हवेत उडणारी वस्तू) पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्याची माहिती दिली होती. त्यानंतर भारताकडून ‘चुकून’ क्षेपणास्र पाकिस्तानच्या हद्दीत पोहचल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

‘नियमित देखभाल कार्यादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या दिशेनं उडाल्याचा’ दावा भारतानं केला होता. भारतानं या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचेही आदेश दिले आहेत.

भारतीय क्षेपणास्र लाहौरपासून २७५ किलोमीटर दूर मियाँ चन्नू भागाजवळच्या एका कोल्ड स्टोअरवर कोसळल्यानं अनेक विमान कंपन्यांची पाचावर धारण बसली होती. मात्र, या क्षेपणास्रामुळे पाकिस्तानात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तीय हानी झाली नव्हती.

भारताच्या स्पष्टीकरणावर पाकिस्तान असमाधानी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अपघातानं कोसळलेल्या क्षेपणास्राबद्दल बोलताना, भारताच्या स्पष्टीकरणावर आपण समाधानी नसल्याचं मत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानं व्यक्त केलं होतं. तसंच या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याची मागणीही पाकिस्ताननं केली होती.

क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडल्यानंतर वस्तुस्थितीची पुष्टी करण्यासाठी पाकिस्ताननं या घटनेची संयुक्त चौकशी करण्याचा प्रस्ताव नवी दिल्लीला दिला असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानं म्हटलंय.

‘चुकून क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्यानंतरही याची त्वरित माहिती देण्यात भारत अपयशी’ ठरल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय. तसंच अशा प्रकरणांत भारताच्या सुरक्षा उपयांबद्दही पाकिस्ताननं प्रश्न उपस्थित केलंय.

Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा करोना संक्रमितUkraine Crisis: युक्रेनमध्ये रशियानं नवजात बालकांनाही सोडलं नाही, बॉम्बवर्षावात रुग्णालय उद्ध्वस्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here